शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खाकी वर्दीतल्या गुन्हेगारांनाही सोडणार नाही..: सुहेल शर्मा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:14 IST

सांगली : गुन्हेगार रस्त्यावरचे असोत अथवा वर्दीतले, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिला.

ठळक मुद्देजिल्हा पोलिसप्रमुख पदाची सूत्रे तातडीने स्वीकारली;जनसामान्यात पोलिसांची प्रतिमा मलिन झाल्याची भावना

सांगली : गुन्हेगार रस्त्यावरचे असोत अथवा वर्दीतले, कोणालाही सोडणार नाही, असा इशारा सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हा पोलिसप्रमुख सुहेल शर्मा यांनी गुरुवारी दिला.तत्कालीन जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांची गुरुवारी तडकाफडकी बदली झाली. बदलीचा आदेश निघताच अवघ्या तीन तासात शर्मा यांनी नूतन पोलिसप्रमुख पदाची सूत्रे स्वीकारली. अतिरिक्त जिल्हा पोलिसप्रमुख शशिकांत बोराटे यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर शर्मा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

शर्मा म्हणाले, अनिकेत कोथळे प्रकरण पूर्णपणे माहीत झाले आहे. अतिशय निंदनीय घटना घडली आहे. सीआयडी याचा तपास करीत आहेत. संशयित आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणामुळे सांगली पोलिसांच्या प्रतिमेला तडा गेला आहे. जनसामान्यात पोलिस दलाची असलेली प्रतिमा मलिन झाली आहे.

अत्यंत खडतर काळात शासनाने माझ्यावर विश्वास टाकून सांगलीच्या पोलिसप्रमुख पदाची जबाबदारी सोपविली आहे. चांगले काम करुन हा विश्वास सार्थ करुन दाखविला जाईल. जनसामान्यांमध्ये असलेली पोलिस दलाची प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न केले जातील. पोलिस व जनता यांच्यात कुठे दुरावा निर्माण होत असेल, तर तो दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. जनसंपर्क ठेवून कामे करण्यावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.सारेच वाईट नसतात...शर्मा म्हणाले, पोलिस दलात सर्वच अधिकारी व कर्मचारी वाईट नसतात. पण जे वाईट व कामचुकार आहेत, त्यांची गय केली जाणार नाही. गुन्हेगार रस्त्यावरचा असो अथवा वर्दीतला, त्याला सोडणार नाही. कायदा काय असतो, हे त्यांना दाखवून दिले जाईल. चांगले काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांच्या पाठीवर नेहमीच शाबासकीची थाप मारली जाईलपोलिसिंगवर भरशर्मा म्हणाले, सांगली जिल्ह्यात काम करताना बेसिक पोलिसिंगवर भर दिला जाईल. जनसंपर्क हा केंद्रबिंदू मानून काम केले जाईल. जिल्ह्याचा दौरा करुन माहिती घेतली जाईल. अधिकाºयांची बैठक घेतली जाईल. त्यांच्या अडचणी समजावून घेतल्या जातील. त्यानंतर कामाची दिशा स्पष्ट केली जाईल.

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस